ल पारी...
पॅरीस विमानतळावरून पॅरीसमध्ये प्रथमच उतरले मी. एरवी येताजाता वाटेत केवळ एक थांबा होता पॅरीस हा. मुंबईहून येणारी विमानं उतरण्याचा चार्ल्सडगॉल विमानतळाचा हा हिस्सा तसा थोडा गरीबच होता. मुख्य विमानतळाचा भव्य रुबाब इथे नव्हताच. तिथून बाहेर पडल्यावर टॅक्सी घेऊन आमच्या रहाण्याच्या ठिकाणी बॅस्टिलमधल्या रु-द-तायलँदेला जायचं होतं. TAXI अशी मोठी पाटी असलेल्या दिशेने निघालो. तर तीन तरूण आम्हाला सामोरे आले. “गुड मॉर्निंग, पॅरीस?” असे विचारत तिघांनीही घेरलं. त्यातल्या एकाने बरोबर खालच्या दिशेने यायची खूण केली. त्याला सांगितलं रु द तायलँन्देला जायचंय. तर म्हणाला इफ यू शो मी आय विल तेक यू देर. अरेच्या. म्हणजे हा घुमवणार. त्याने खाली यायची खूण केली तेव्हा संशय आलाच होता. तडक उलटे फिरलो. बाहेर आलो तर तीन चार टॅक्सीज उभ्या होत्या. तिथे उभ्या असलेल्या आशियाई वंशाच्या फ्रेंच मुलीने आम्हाला त्यातली एक घ्यायला सांगितली. त्याला पत्ता माहीत आहे म्हणाली. मर्सिडीझ टॅक्सीचा ड्रायवर यत्किंचितही इंग्लिश न येणारा होता. पण त्याने बॅस्टिलमधल्या त्या पत्त्यावर बरोबर पोहोचवले. खाली उतरल्यावर सामानही काढून ठेवले. धनंजयने त्याला लगेच शिकवल्याप्रमाणे मर्सी बुकू म्हणून टाकलं. तर त्याने विचारलं- मनी? बहुतेक त्याला शंका आली की हा गडी मर्सी बुकू म्हणून फुटवतो की काय! धनंजयने हसून पैसे-टिप वगैरे दिल्यानंतर मग त्याने आनंदात मर्सी बुकू करून टाकलं.

आणि मग एक वर्ष दूर राहिलेला लेक त्या गल्लीच्या कोपऱ्यावरून हात
हलवताना दिसला. आता ते आनंदाचं भरतं सांगत नाही. ते तर शब्दापलिकडलं. आता येते वीस
दिवस आम्ही बरोबर असणार याचा आनंद... आणि त्यातला रोज एकेक दिवस कमी होत जाणार
याचं दुःख हातात हात घालून लगेच मनात हजर झालेले.
तर या रु द तायलँदेवरच्या इमारतीत आम्ही एअर बीएनबी मार्पत एक घर सहा
दिवसांसाठी घेतलेलं. त्यामुळे तिघं घरातल्यासारखे तिथे रहाणार होतो. एक हॉल, एक
बेडरुम आणि सुसज्ज छोटंसं किचन. एमिली सित्रुक नावाच्या एका तरुणीचं ते घर होतं.
सेंट्रल पॅरीसमधलं हे घर असं एअर बीएनबी मार्फत भाड्याने देऊन ती आपल्या बॉयफ्रेन्डबरोबर
थोडी दूर कुठेशी रहात होती. नाटकात कामं करायची. वाचनाची खूप आवड. हॉलची एक अख्खी
भिंत आणि एक अर्धी भिंत पुस्तकं, नाटकाच्या, म्युझिकच्या सीडीज् यांनी भरलेली.
तिच्या भिंतींवरची चित्र, फोटोग्राफ्स, जमवलेल्या वस्तू दर्जेदार होत्या. खूपच बरं
वाटलं. खरंच घरासारखं.
ताजेतवाने होऊन, थोडं खाऊन आम्ही तीन तासांनंतर
बाहेर पडलो. सुश्रुतने आदल्या दिवशी भ्रमंती करून म्यूझियम पासेस विकत घेऊन
ठेवलेले. आयफेलची तिकिटं आधीच ऑनलाईन काढलेली. त्यामुळे अर्धं काम झालेलं. मेट्रो
साठी बॅस्टिलच्या चौकात गेलो आणि जिथे तो इतिहासप्रसिध्द तुरुंग होता त्या जागी
उभारलेला स्तंभ आणि त्यावरचं सोनेरी शिल्प प्रथम पाहिलं. तो चौक अतिशय देखणा आहे.
नंतरच्या सहा दिवसात पायाखालचा झाला. मेट्रो घेऊन लुव्रच्या मागच्या बाजूला उतरलो.
वाटेतलं चर्च, छोटीशी बाग, सुंदरशी अनोळखी झाडं पाहात रमत गमत सेन नदीच्या शेजारून
जाणाऱ्या रस्त्यापाशी आलो. काही काळ माझंही जपानी टूरिस्टीकरण झालं होतं. काहीही
वेगळं दिसलं की माझा मोबाईल क्लिकक्लिकू लागे. अनोळखी झाडं- जी अगदी परत
आल्यानंतरच शोधून काढून ओळख करून घेतली ती मेपल्स, लिंडेन, हॉर्स चेस्टनट, लंडन
प्लेन, विंगनट, ओक्स, एल्म्सची झाडं फारच खुणावत होती. रस्त्यावर लावलेल्या
झाडांच्या बुंधांचे सिंमेंटने गळे न घोटता त्यांच्या भोवतीने प्रशस्त गोलाकार माती
ठेवून त्यावर लोखंडी जाळी बसवण्याची कल्पकता आणि संवेदना पाहून तर खूपच बरं वाटलं
होतं. ओसांडून न वाहणाऱ्या कचऱ्याच्या छानशा बास्केटचाही फोटो घेतला मी. वाटेत
लागलेल्या सेंट जर्मेन ऑक्सेरॉइस नावाच्या चर्चच्या बेल
टॉवरकडे लक्ष गेलं. बाराव्या शतकात बांधकाम सुरू झालेल्या त्या चर्चचा मूळ बेलटॉवर
अजून तसाच उभा आहे. सोळाव्या शतकात या चर्चच्या साक्षीने हजारो प्रोटेस्टंट्सचं
शिरकाण झालेलं. आता त्या टॉवरच्या पुढल्या भागात चित्रप्रदर्शनं लावलेली असतात.
आताही एक चालू होतं. फार विशेष काही नव्हतं. पण चर्चच्या समोर फूटपाथवर एक
उर्ध्वगामी वळणदार दगडी पट्ट्यांचं शिल्प होतं. आकाशात घुसलेले लयदार आकार.
क्लिकक्लिक.
पुढे रस्त्यावर- आणि खरं म्हणजे रस्तोरस्ती कॅफेंच्या बाहेर छोटीशी
टेबल्स, खुर्च्या टाकलेल्या होत्या. लोक प्रसन्नपणे खातपीत रस्त्याकडे पाहात
बसलेले दिसतात. हे चित्र इतकं कॉमन आहे की पॅरीसमधल्या लोकांना काही कामंधामं आहेत
की नाही प्रश्न पडावा. पण त्यातले अर्धेअधिक टूरिस्ट होते हेही खरं.
सेनच्या कठड्याच्या बाजूने चित्रे, पोस्टर्स, जुने मासिके,
पिक्चरफ्रेम्स विकणाऱ्या टपऱ्या होत्या. पण देखणेपणाने नेमक्या जागेत लावलेल्या.
संधी मिळाली की फैलते रहो हा भाव नव्हता.
जिथून रिवर क्रूझची बोट सुटते तो पाँ नूफ नावाचा
पूल गाठायला चाललो होते. सेनवरच्या सदतीस पुलांपैकी हा एक आणि आम्ही पाहिलेला
पहिला. या पुलावर पॅरीसची सुप्रसिध्द प्रेमाची कुलपं
प्रथम दिसली. सगळ्या पुलांवर मिळून पाचदहा लाख कुलपं आहेत म्हणे. आणि सेनच्या
पात्रात कचरा नाही पण किल्ल्या नक्कीच टाकतात हे प्रेमवीर लोक. इथं कुलुप बांधून
चावी नदीत टाकली की आपलं प्रेम कधीच तुटणार नाही हा विश्वास असतो. माहीत नाही कुणी
या रोमॅन्टिक अंधविश्वासावर काही सामाजिक सर्वेबिर्वे केलाय का. पण ती कुलुपं
पाहून लोक एकमेकांवर शेवटपर्यंत प्रेम करू शकले नाहीत तरी करू इच्छितात एवढं तर
कळलं. हा पूल फारच सुंदर, प्रशस्त बांधलेला आहे. त्यावर जडवलेले दिवेही सुंदर
होते. गिटार घेऊन वाजवत बसलेला एक एकल गिटारिया पुलावर सूर भरत होता.
सेनच्या पात्राकडे पाहात, तिच्या काठावर मुद्दम
आणून अंथरलेल्या पांढऱ्या प्रवाळी वाळूत खेळणारी मुले, उन्हाची
आंघोळ करत पहुडलेले लोक पाहात, बोटींची ये जा पाहात फोटो काढत पलिकडल्या काठावर
पोहोचलो. बोटीत बसलो. स्पीकर बोलत सेनकाठच्या ‘पॅरी’बद्दल माहिती देणारी तरूणी
होती. सेनवर बांधलेल्या, वाटेत लागणाऱ्या प्रत्येक पुलाची छान माहिती देत होती,
काठावरच्या इमारतींची माहिती देत होती. पात्राच्या कडेने अनेक सुंदर बोटहाऊसेस
होती. फुलझाडं, वेली चढवून चित्रासारखी देखणी केलेली. त्यातली काही खरोखरच
बोटींची, तर काही बोटसदृश कायम ड्रेनेज व्यवस्था असलेली. एकाही बोटीभोवती कचऱ्याचं
बेट नव्हतं. अठराव्या शतकात पॅरीस श्रीमंत होतं पण अस्वच्छ होतं, हे सांगून खरं
वाटणार नाही, इतकं नितळ स्वच्छ, हिरवंनिळं पाणी जिवाला हेलकावे देत होतं. आयफेल
टॉवरच्या जरासं पुढे जाऊन बोट मागे वळली. मग उलटी नदीतल्या बेटावर उभारलेल्या
नॉत्रदाम चर्चला फेरी घालून पुन्हा पहिल्या ठिकाणी आली. पॅरीसच्या सेनकाठावरल्या
सर्व मुख्य इमारतींचे, असे ओझरते दर्शन घडल्यावर लक्षात आलं, की या अफाट, महाप्रचंड
नगरातला हा एवढा पट्टा नीट पाहायचा तरीही सहा दिवस पुरणार नाहीत. शिवाय अलिकडे
पलिकडे कायकाय असणारच होतं. चलो... आपला वेळ, पैसे, यात जे बसेल ते वेचून पाहून
घेणं हेच केवढं मोठं आव्हान होतं शरीर आणि मनाला.
Looks like you are doing all this for publicity.If you have such sick mind to support what happened in pulwama as how is the Jaish?If you are so concerned why don't you go there and ask the CPRF jawans they will give you proper replay lady.Get well soon😊💐
ReplyDeleteMugdha Karnik tu shen kha shen. Heech tuzi aukat aahe.. pakistan madhye jaun bheek mag. Chal bhaag kutiaya..
ReplyDeleteYour comments supporting terrorists show utter lack of morality. What a disgrace you are. Hope your family also suffers the same fate.
ReplyDeleteखूप सुंदर लिहिलंय माई, आवडलं, माझी जग फिरायची इच्छा अजून प्रबळ केल्या बद्द्ल आभार
ReplyDelete